मेट्रो २-अ, ७ ची तिकिटे मिळणार उबर ॲपवरून; तिकिटावर मिळणार कमाल १० रुपयांची सूट 
मुंबई

मेट्रो २-अ, ७ ची तिकिटे मिळणार उबर ॲपवरून; तिकिटावर मिळणार कमाल १० रुपयांची सूट

महामुंबई मेट्रोने मुंबई मेट्रो मार्गिका २-अ आणि ७ साठी तिकिटे थेट उबर ॲपवरून उपलब्ध करून दिली आहेत. तिकिटावर प्रवाशांना तत्काळ कमाल १० रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : महामुंबई मेट्रोने मुंबई मेट्रो मार्गिका २-अ आणि ७ साठी तिकिटे थेट उबर ॲपवरून उपलब्ध करून दिली आहेत. तिकिटावर प्रवाशांना तत्काळ कमाल १० रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि पूर्णपणे पेपरलेस होणार असून तिकीट खिडक्यांवरील गर्दीही कमी होणार आहे.

मुंबईकरांना मेट्रो मार्गिका २-अ आणि ७ साठी क्यूआर-कोड आधारित तिकिटे थेट उबर ॲपवरून बुक करण्याची सोय बुधवारपासून उपलब्ध करून दिली आहे. मुंबईने यापूर्वीच एकात्मिक डिजिटल मोबिलिटीमध्ये देशात आघाडी घेतली आहे. मुंबई वन ॲप हे देशातील पहिले आणि एकमेव कॉमन मोबिलिटी प्लॅटफॉर्म असून यात उपनगरीय रेल्वे, मेट्रो, बस आणि मोनोरेल या सर्व सेवा एकाच इंटरफेसवर उपलब्ध आहेत. यासोबतच व्हाॅट्सॲॅपद्वारे तिकिटिंग आणि मुंबई वन कार्ड (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) या सुविधांमुळे प्रवाशांना विविध परिवहन माध्यमांमध्ये अखंड, कॅशलेस प्रवास करता येतो. या सर्व उपक्रमांमुळे मुंबईत एक सुसंगत, प्रवासी-अनुकूल आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम परिवहन व्यवस्था निर्माण झाली आहे.

मेट्रो तिकिटिंग सुविधा आधीपासूनच अनेक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. आता उबर या नेटवर्कमध्ये सामील झाल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या पसंतीच्या ॲपद्वारे मेट्रो सेवा वापरण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या एकात्मिक मोबिलिटी दृष्टिकोनाला अधिक बळकटी देण्यासाठी एमएमआरडीए आणि महामुंबई मेट्रोतर्फे बेस्ट बससेवा, पादचारी पूल आणि मेट्रो स्थानकांजवळील पार्किंग सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. यामुळे पहिला आणि शेवटचा टप्पा अधिक सुलभ होईल. सध्या मेट्रो मार्गिका २-अ आणि ७ वर दररोज ३.५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून, लवकरच मार्गिका २-ब आणि ९ कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि सुसंगत होणार आहे.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन