Mumbai : प्रवाशांना दिलासा! मेट्रो ३ वर नवे प्रवेशद्वार सुरू; 'या' प्रमुख स्थानकांवर सुविधा 
मुंबई

Mumbai : प्रवाशांना दिलासा! मेट्रो ३ वर नवे प्रवेशद्वार सुरू; 'या' प्रमुख स्थानकांवर सुविधा

जगन्नाथ शंकरशेठ, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर नवे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे (एक्झिट) गेट्स सुरू करण्यात आले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन) वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. जगन्नाथ शंकरशेठ, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर नवे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे (एक्झिट) गेट्स सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रमुख भागांपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे होणार आहे.

कोणत्या स्थानकांवर कोणते गेट्स सुरू?

मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,

  • जगन्नाथ शंकरशेठ (मुंबई सेंट्रल)
    ➝ गेट B4 : मराठा मंदिरकडे जाण्यासाठी

  • आचार्य अत्रे चौक
    ➝ गेट A1 आणि A2 : MCGM इंजिनिअरिंग हबजवळ

  • वरळी मेट्रो स्थानक
    ➝ गेट A2 : कमला मिल्स परिसराकडे

या नवीन गेट्समुळे कार्यालये, व्यावसायिक केंद्रे आणि महत्त्वाच्या ठिकाणी जाणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

प्रवास अधिक सुलभ

मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो असलेली अक्वा लाईन शहरातील उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी वाढवत आहे. एसी सुविधा आणि वेगवान प्रवासामुळे या मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळत आहे.

नेटवर्क समस्या कायम

तथापि, भूमिगत मार्गांमध्ये मोबाइल नेटवर्कचा अभाव ही मोठी समस्या ठरत आहे. पूर्वी आरे-JVLR ते आचार्य अत्रे चौक दरम्यान वोडाफोन सेवा उपलब्ध होती, मात्र सध्या तीही बंद झाली असून आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वाय-फायची मागणी

या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मेट्रो प्रशासनाला पूर्ण नेटवर्क सुविधा उपलब्ध होईपर्यंत वाय-फाय सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष