मुंबई

Mumbai : '...तर गॅस कनेक्शन बंद होईल!' Mahanagar Gasच्या नावाने सायबर स्कॅम; अंधेरीत महिलेला ₹५,०००चा गंडा

मेसेज पाहून घाबरलेल्या महिलेने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला 'राहुल कुमार' असे सांगत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील अंधेरी (मरोल) परिसरात सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या नावाने बनावट मेसेज पाठवून एका महिलेला ₹५,०००चा गंडा घालण्यात आला. सुदैवाने, तिच्या डेबिट कार्डवरील व्यवहार मर्यादेमुळे मोठे नुकसान टळले.

...तर गॅस कनेक्शन बंद होईल!

माहितीनुसार, महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर "बिल अपडेट केले नाही तर आज रात्री १०:२५ वाजता गॅस कनेक्शन बंद होईल" असा मेसेज आला. हा मेसेज पाहून घाबरलेल्या महिलेने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला 'राहुल कुमार' असे सांगत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

APK फाईलद्वारे फसवणूक

सुमारे ४५ मिनिटांच्या कॉलदरम्यान आरोपीने महिलेला 'BILL_UPDATE.apk' नावाची फाईल डाउनलोड करायला लावली. ही फाईल मोबाईलमधील माहिती चोरणारे टूल म्हणून काम करू लागले. त्यानंतर आरोपीने महिलेला डेबिट कार्डची माहिती भरायला सांगितली आणि त्याने ती माहिती थेट कॅप्चर केली.

समोरच्या व्यक्तीने स्वतःला 'राहुल कुमार' असे सांगत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

₹५,०००चा फटका,मोठं नुकसान टळलं

यानंतर महिलेच्या खात्यातून ₹५,००० वजा झाले. मात्र, डेबिट कार्डची दैनंदिन मर्यादा ₹५,००० असल्याने पुढील मोठा व्यवहार होऊ शकला नाही.

बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशाच प्रकारात परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांची ₹८०,०००पर्यंत फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

दुसऱ्या व्यक्तीलाही पाठवली APK फाईल

आरोपीने महिलेच्या ओळखीतील आणखी एका व्यक्तीलाही ही APK फाईल पाठवली होती. मात्र, त्या व्यक्तीकडे iPhone असल्याने फाईल डाउनलोड झाली नाही आणि तो फसवणुकीपासून वाचला.

तक्रार दाखल, पुढील तपास सुरू

या प्रकरणी महिलेने राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल (NCRP) वर तक्रार नोंदवली आहे. पुढील तपासासाठी हा प्रकार पवई पोलिसांकडे पाठवण्यात आला आहे.


प्राथमिक तपासात, आरोपीने महिलेच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून विश्वास निर्माण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महानगर गॅसची नागरिकांना सूचना

फसवणुकीची शक्यता लक्षात घेता यापूर्वीच महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • कंपनी कधीही OTP, बँक तपशील किंवा पासवर्ड विचारत नाही

  • फक्त +९१ ९८९९२ ०३८४३ या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरच संपर्क साधावा

  • महानगर गॅस लिमिटेडबाबत संशयास्पद मेसेज किंवा कॉल आले तर त्वरित (०२२) ६८६७ ४५००, (०२२) ६१५६ ४५०० या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भीषण अपघात! Air Canada Express विमानाची फायर ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी, VIDEO

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी भारत मार्गदर्शक बनणार; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन