Mumbai : सार्वजनिक प्रसाधनगृहांचे सेवा दर आता महागणार; महिलांसाठी ५, तर पुरुषांसाठी १ रुपया 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : सार्वजनिक प्रसाधनगृहांचे सेवा दर आता महागणार; महिलांसाठी ५, तर पुरुषांसाठी १ रुपया

मुंबईकरांचे सार्वजनिक प्रसाधनगृह वापर करणे आता महागणार आहे. पालिकेने ‘पैसे द्या, वापरा’ तत्त्वावरील सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांचे सार्वजनिक प्रसाधनगृह वापर करणे आता महागणार आहे. पालिकेने ‘पैसे द्या, वापरा’ तत्त्वावरील सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार सध्या महिलांसाठी मोजावे लागणारे दोन रुपये वाढवून पाच तर पुरुषांना आतापर्यंत मोफत असलेल्या या सुविधेसाठी एक रुपया आकारण्याचे प्रस्तावित आहे तसेच स्नानाचे शुल्क पाच रुपयांवरून १० करण्याचीही तयारी आहे. सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

महापालिकेने ‘पैसे द्या, वापरा’ तत्त्वावर शौचालये उभारली आहेत. सध्या २४ विभागांतील झोपडपट्ट्या, वस्त्या आणि चाळींमध्ये ३ हजारांहून अधिक सार्वजनिक शौचालये आहेत. याशिवाय वर्दळीच्या रस्त्यांवर ८४६ शौचालये सुरू आहेत ज्यांची देखभाल खासगी संस्था करतात.

वातानुकूलित शौचालयांचे दरही वाढणार

महापालिकेच्या वातानुकूलित ‘पैसे द्या, वापरा’ शौचालयांसाठीही दरवाढ प्रस्तावित आहे. त्यानुसार, पुरुषांसाठी एक रुपया, महिलांसाठी पाच रुपये, शौचासाठी आठ रुपये आणि स्नानासाठी १५ रुपये आकारण्याचे नियोजन आहे. सध्या महिलांसाठी दोन रुपये, शौचासाठी पाच रुपये आणि स्नानासाठी दहा रुपये शुल्क आकारले जाते.

पासही महागणार

महापालिकेच्या शौचालयांसाठी उपलब्ध असलेल्या १५० रुपयांच्या पासच्या दरातही वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, सार्वजनिक शौचालयांच्या एकूण जागेपैकी ४० टक्के जागेवर जाहिराती प्रदर्शित करण्याची मुभा देण्यात आली आहे. जाहिरातींतून मिळणाऱ्या महसुलाचाही शौचालयांच्या देखभालीसाठी उपयोग करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

इंडिया आघाडीचे नेते भेटले राष्ट्रपतींना, मतचोरीचा मुर्मू यांनी इन्कार केला नाही - राहुल गांधी

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक