Mumbai : लोहमार्ग पोलिसांची धडक कारवाई; रेल्वे प्रवाशांचे चोरीस गेलेले १,६६५ मोबाईल हस्तगत 
मुंबई

Mumbai : लोहमार्ग पोलिसांची धडक कारवाई; रेल्वे प्रवाशांचे चोरीस गेलेले १,६६५ मोबाईल हस्तगत

रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेलेले तब्बल २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १ हजार ६६५ मोबाईल हस्तगत करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेलेले तब्बल २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १ हजार ६६५ मोबाईल हस्तगत करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. हे मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गर्दीचा फायदा घेत चोरांकडून लोकल, मेल एक्स्प्रेसमधून प्रवाशांचे मोबाईलचोरांकडून लंपास करण्यात येतात. गेले काही वर्षांत चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी पदभार स्वीकारल्यापासून रेल्वे गुन्हेगारी, विशेषतः मोबाईल

चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. वर्ष २०२४, २०२५ आणि जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या छडा गुन्ह्यांचा लावण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या विविध पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने 'विशेष शोध मोहीम-३' अंतर्गत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

या मोहिमेत १ हजार ६६५ मोबाईल शोधण्यात आले. हस्तगत केलेल्या मोबाईलची एकूण बाजारपेठ किंमत २.४९ कोटी रुपये आहे. चोरीनंतर महाराष्ट्राबाहेर गेलेले मोबाईल शोधण्यासाठी संबंधित राज्यांच्या पोलिसांसोबत समन्वय साधला जात आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू