Mumbai : पाऊस आला आणि गेलाही!  
मुंबई

Mumbai : पाऊस आला आणि गेलाही!

उन्हाच्या काहिलीने भाजून निघालेल्या मुंबईकरांवर रविवारी पावसाने थोडा काळ कृपादृष्टी केली. मुंबई व उपनगरात  रविवारी सकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला.

Swapnil S

मुंबई : उन्हाच्या काहिलीने भाजून निघालेल्या मुंबईकरांवर रविवारी पावसाने थोडा काळ कृपादृष्टी केली. मुंबई व उपनगरात  रविवारी सकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला. पण नंतर दिवसभरात उकाड्याने मुंबईकरांना हैराण केले.

गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून आता २३ जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल होत आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने सोमवारपासून मुंबई आणि ठाणे परिसरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे सध्याच्या दमट वातावरणातून नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

२५ जूनपर्यंत मान्सूनचा जोर महाराष्ट्रात फारसा वाढणार नसला, तरी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. २५ जून ते २ जुलै या कालावधीत मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने होईल आणि उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढेल.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग