Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video X
मुंबई

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

मुंबई, नवी मुंबई आणि वसई-विरारमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. फोर्ट, सायन, वांद्रे, सानपाडा आणि एपीएमसी परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून आयएमडीचा रेड अलर्ट कायम आहे.

Mayuri Gawade

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर शनिवारीही (दि. ०४) कायम राहिला आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. फोर्ट, सायन, वांद्रे, सानपाडा, नवी मुंबईतील एपीएमसी बाजार तसेच वसई-विरार परिसरालाही पावसाचा फटका बसला असून, वाहतुकीवर आणि जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.

फोर्ट, सायन, वांद्रे परिसरात पाणी साचले

मुसळधार पावसामुळे दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तर सायन आणि वांद्रे परिसरातही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलत आहे. विशेषतः वांद्रेतील व्यावसायिक भागात पाणी साचल्यामुळे कार्यालयीन कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी बाजार जलमय

सततच्या पावसामुळे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)च्या भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सानपाडा परिसरातही रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

वसई-विरारलाही पावसाचा फटका

मुंबईसह वसई-विरार परिसरातही रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही भागांतील वाहतुकीवर परिणाम झाला असून, नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेड अलर्ट; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

मुंबई आणि नवी मुंबईसाठी आयएमडीने अतिमुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट कायम ठेवला आहे. रविवारी आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग आणि पाणी साचलेल्या रस्त्यांपासून दूर राहावे तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, रेड अलर्ट असूनही काही नागरिक गेटवे ऑफ इंडियावर कुटुंबीय आणि मित्रांसह पावसाचा आनंद घेताना दिसले.

Mumbai : ‘शताब्दी’ला एनएबीएच मानांकन; पालिकेचे पहिले सामान्य रुग्णालय ठरले

Pune : बनावट कॉल सेंटरवर ईडीची कारवाई

कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची तक्रार; जनरलच्या डब्यात 'पार्सल'वाल्यांची घुसखोरी

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण : पार्थ पवारांविरुध्द गुन्ह्यासाठी याचिका