Mumbai : थेंबे थेंबे तळे साचे! धरणातील पाणीसाठा पुन्हा एक लाख दशलक्ष लिटरवर प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : थेंबे थेंबे तळे साचे! धरणातील पाणीसाठा पुन्हा एक लाख दशलक्ष लिटरवर

गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने धरणात क्षेत्रातही एंट्री केली आहे. त्यामुळे ३० जून रोजी ६.७५ टक्क्यांवर आलेला पाणीसाठा १ जुलै रोजी ७.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पुन्हा एकदा १ लाख ३ हजार ८७१ दशलक्ष लिटर वर पोहोचला आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने धरणात क्षेत्रातही एंट्री केली आहे. त्यामुळे ३० जून रोजी ६.७५ टक्क्यांवर आलेला पाणीसाठा १ जुलै रोजी ७.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पुन्हा एकदा १ लाख ३ हजार ८७१ दशलक्ष लिटर वर पोहोचला आहे.

धरण क्षेत्रात वरुणराजाची अशीच कृपादृष्टी राहिली तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होईल. दरम्यान, पवई तलाव बुधवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ओसंडून वाहू लागला.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात १ जुलै रोजी १ लाख ६ हजार ८७१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

१ जुलै रोजी पाणीसाठा (टक्के)

  • अप्पर वैतरणा - ०

  • मोडक सागर - २०.००

  • तानसा - २.७२

  • मध्य वैतरणा - ११.७१

  • भातसा - ४.९०

  • विहार - ५०.७७

  • तुळशी - २८

१ जुलै रोजी सातही धरणातील तीन वर्षांतील पाणीसाठा

  • २०२६ - ७.१८ टक्के

  • २०२५ - ४१.१७ टक्के

  • २०२४ - ५.९१ टक्के

३० जून रोजीचा पाणीसाठा (टक्के)

  • २०२६ - ६.७५

  • २०२५ - ४०.२२

  • २०२४ - ५.४६

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा