'एआय'ने बनविलेली प्रतिमा
मुंबई

Mumbai : वाढदिवसाच्या मेजवानीत एसी बंद; ग्राहक आयोगाचा रेस्टॉरंटला दंड

एसी ही कोणत्याही हॉल बुकिंगमधील अत्यावश्यक सेवा असल्याचे नमूद करत अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (उपनगर) लोअर परळस्थित रेस्टॉरंटला दणका दिला.

Krantee V. Kale

मुंबई : वाढदिवसाच्या पार्टीत एसी बंद पडल्याने पाहुण्यांचे हाल झाल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने रेस्टॉरंटला चपराक लगावली. एसी ही कोणत्याही हॉल बुकिंगमधील अत्यावश्यक सेवा असल्याचे नमूद करत अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (उपनगर) लोअर परळस्थित रेस्टॉरंटला दणका दिला.

तक्रारदार महिलेला नुकसानभरपाई म्हणून २२,५५७ रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ऑगस्ट २०२४ पासून या रकमेवर वार्षिक ६ टक्के दराने व्याजही द्यावे लागणार आहे. याशिवाय तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी १० हजार व कायदेशीर खर्चासाठी ५ हजार देण्याचे निर्देश दिले आहेत.

घाटकोपरमधील महिलेने जुलै २०२४ मध्ये लोअर परळ येथील हॉटेलचा बँक्वेट हॉल नातेवाईकाच्या वाढदिवसासाठी बुक केला होता. यासाठी भोजन आणि इतर सेवा मिळून ३.६३ लाख दिले होते. मात्र, एसी यंत्रणा बंद पडल्याने पाहुण्यांना गुदमरल्यासारखे होऊन मोठा त्रास सहन करावा लागला होता.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च