मुंबई

रस्ते कंत्राटदारांना ५० लाखांचा दंड; कामात दिरंगाई, तर कारवाई अटळ - अभिजित बांगर

पावसाळ्यातमुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा, असे आदेश दिले असताना खड्डे बुजवण्याकडे कंत्राटदारांनी दिरंगाई केली.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यातमुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा, असे आदेश दिले असताना खड्डे बुजवण्याकडे कंत्राटदारांनी दिरंगाई केली. त्यामुळे जून ते आतापर्यंत ५० लाख ५३ हजारांचा दंड कंत्राटदारांना ठोठावला, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. दरम्यान, यापुढे ही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष कामांत कुचराई केली तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी कंत्राटदारांना दिला आहे.

मुंबईकर नागरिकांच्‍या सोयीसाठी रस्‍ते आणि वाहतूक विभागामार्फत एकूण २२७ बीटसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, पावसाळापूर्व तयारीच्या कामांमध्ये, सर्व दुरुस्ती योग्य रस्त्यांच्या कामांसाठी एकूण १८ कंत्राटदारांची नेमणूक करण्‍यात आली आहे. महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्‍टिक पद्धतीने तत्काळ बुजवत आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्‍या अखत्‍यारितील रस्‍त्‍यांवर पावसाळ्यादरम्‍यान पडलेले खड्डे आणि दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍यांची डागडुजी कंत्राटदारांमार्फत ठरलेल्या कालावधीत होत नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेऊन कंत्राटदारांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिळून आतापर्यंत एकूण ५० लाख ५३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्‍यात खड्डे बुजविणाऱ्या कंत्राटदारांना मिळून २८ लाख ३० हजार रुपये, प्रकल्‍प कंत्राटदारांना मिळून २० लाख ४५ हजार रुपये आणि दोषदायित्‍व कालावधीतील कंत्राटदारांना मिळून १ लाख १८ हजार रुपये रकमेचा समावेश आहे. १ जून २०२४ ते २५ जुलै २०२४ या कालावधीतील हा दंड आहे.

दंडाची रक्कम देयकातून वसूल करणार

शहर विभागातील कंत्राटदारांना ८ लाख ८५ हजार रुपये, पूर्व उपनगरांमधील कंत्राटदारांना ५ लाख ४८ हजार रुपये, पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांना २४ लाख ८५ हजार रुपये आणि महामार्ग कंत्राटदारांना ११ लाख ३५ हजार रुपये दंड आकारण्‍यात आला आहे. त्‍यांच्‍या देयकातून ही रक्‍कम वसूल केली जाणार आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन