मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार

मुंबई आणि महानगर प्रदेशात ऑगस्ट महिन्यात जाणवलेला पावसाचा खंड सप्टेंबरमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई तसेच शेजारील जिल्ह्यांसाठी पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही. मात्र, या काळात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशात ऑगस्ट महिन्यात जाणवलेला पावसाचा खंड सप्टेंबरमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई तसेच शेजारील जिल्ह्यांसाठी पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही. मात्र, या काळात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अधूनमधून हलका पाऊस पडू शकतो. कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या ऑगस्टमध्ये मुंबईत सरासरीपेक्षा ६६ टक्के कमी पाऊस झाल्याचे वृत्त ‘एफपीजे’ने गेल्या आठवड्यात दिले होते. एल निनोच्या हवामानविषयक परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईत आतापर्यंत सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा सध्या सुमारे ९५ टक्क्यांवर आहे. रविवारी सकाळपर्यंत सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ९५.९७ टक्के पाणीसाठा होता. उपयुक्त पाणीसाठा १३.८९ दशलक्ष लिटर इतका होता. सातही जलाशयांची एकूण साठवण क्षमता १४.४७ दशलक्ष लिटर आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पाणीही महागणार! BMC त पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या हालचाली; महसूलवाढीसाठी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता, प्रस्ताव लवकरच आयुक्तांच्या मंजुरीसाठी

Mumbai : लालबाग, परळचे पदपथ झाले मोकळे; बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवले; सलग दोन दिवस केली कारवाई

'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा

दिल्लीत इमारत कोसळली; ४ ठार, ५ गंभीर

MPSC Paper Leak: ...तर आयोगातल्या व्यक्तीलाही शिक्षा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन