मुंबई

मुंबईत शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला; जखमी हाजी सालिन कुरेशी रुग्णालयात दाखल

मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर हा हल्ला झाला आहे.

Swapnil S

मुंबई, : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून या प्रचाराच्या दरम्यान काही गुन्हेगारी स्वरुपाच्या हल्ल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर हा हल्ला झाला आहे.

ज्ञानेश्वर नगरात झाला हल्ला

या घटनेबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, वांद्रे ज्ञानेश्वर नगर येथे प्रचार सुरु असताना अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला. प्रभाग क्रमांक ९२ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्या पोटात चाकू खुपसल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे. या घटनेनंतर हाजी सालिम कुरेशी यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात ऊपचार सुरु आहेत.

हल्ल्याच्या या घटनेनंतर वांद्रे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हल्ला करणारी व्यक्ती कोण होती व हल्ल्याच्या मागचा हेतू काय होता? यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय