Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील एसएनडीटी कॉलेजच्या कराटे प्रशिक्षक महेश नवले याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कुर्ला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.

Mayuri Gawade

मुंबई : माटुंगा येथील एसएनडीटी कॉलेमध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महेश नवले याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी बुधवारी (दि. ०२) रात्री नवलेला ताब्यात घेतलं असून या प्रकारणाचा तपास सुरू आहे.

कुटुंबियांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी नवलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली. पीडित मुलीची प्राथमिक जबानी नोंदवण्यात आली असून, आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे.

चुनाभट्टी-सायनमध्येही कराटे क्लासेस

महेश नवले हा एसएनडीटी कॉलेमध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याशिवाय तो चुनाभट्टी आणि सायन परिसरात स्वतंत्रपणे कराटे क्लासेसही चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रांबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

नवलेकडून यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा गैरप्रकाराची नोंद झाली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी