सव्वा लाख भटक्या कुत्र्यांची नसबंदी; तीन वर्षांत BMC चा २३ कोटी रुपये खर्च; पशुवैद्यकीय महाविद्यालयासह अन्य ९ संस्थांची नेमणूक 
मुंबई

सव्वा लाख भटक्या कुत्र्यांची नसबंदी; तीन वर्षांत BMC चा २३ कोटी रुपये खर्च; पशुवैद्यकीय महाविद्यालयासह अन्य ९ संस्थांची नेमणूक

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढील तीन वर्षांत १ लाख ३५ हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २३ कोटी रुपये खर्च करणार आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह इतर ९ संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढील तीन वर्षांत १ लाख ३५ हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २३ कोटी रुपये खर्च करणार आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह इतर ९ संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या श्वान नियंत्रण विभागातर्फे सन १९९४ पासून भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्राणी जनन नियंत्रण (श्वान) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सन १९९८ पासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम अशासकीय संस्थांच्या सहभागाने पुढे चालू ठेवण्यात आला आहे.

  • २०२४ नुसार भटक्या कुत्र्यांची संख्या - ९०,७५७

  • त्यापैकी नसबंदी झालेल्या श्वानांची संख्या : ३३, ६७१

  • नसबंदी न झालेल्या नर आणि मादी श्वानांची संख्या : (नर २२,४४७, मादी ११,२२४)

  • भविष्यात वाढल्या जाणाऱ्या श्वानांची संख्या : ४,४८,९४७

या संस्था भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणार

  • द वेल्फेअर ऑफ स्ट्रेडॉग्ज-महालक्ष्मी (३००० श्वान) (वार्षिक खर्च ४६.५० लाख रुपये)

  • दि बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल, परळ ( १४०० श्वान)(वार्षिक खर्च २४.५० लाख रुपये)

  • इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, देवनार ( ७,००० श्वान) (वार्षिक खर्च १.०८ कोटी रुपये)

  • अहिंसा मालाड (३४०० श्वान) (वार्षिक खर्च ५२.७०लाख रुपये)

  • उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, मुलुंड (९१८० श्वान) (वार्षिक खर्च १.६० कोटी रुपये)

  • मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ (५४० श्वान) (वार्षिक खर्च ०८.९१ लाख रुपये)

  • युथ ऑर्गनायझेशन इन डिफेंन्स ऑफ ॲनिमल (३७८० श्वान) (वार्षिक खर्च ६६. १५ लाख रुपये)

  • वेटरनली थेरपेटिक्स एंडोसर्जरी अँड मेडिसिन सोसायटी,मुलुंड ( ६४८० श्वान) (वार्षिक खर्च १ कोटी रुपये)

  • युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी, मालाड (५,१०० श्वान) (वार्षिक खर्च १.७८ कोटी रुपये)

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा पार! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद