विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सर्व परीक्षांसाठी परीक्षार्थींनी निर्धारित परीक्षा वेळेच्या किमान ३० मिनिटे अगोदर परीक्षा कक्षात उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सर्व परीक्षांसाठी परीक्षार्थींनी निर्धारित परीक्षा वेळेच्या किमान ३० मिनिटे अगोदर परीक्षा कक्षात उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परिषद तसेच विद्वत परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हा नियम लागू करण्यात आला आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थांची ओळखपत्र तपासणी, आसनव्यवस्था, आवश्यक पडताळणी आणि इतर परीक्षा प्रक्रियांसाठी वेळ आवश्यक असतो. त्यामुळे परीक्षा सुरू होण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी परीक्षा कक्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रावर किंवा परीक्षा कक्षात न येता आवश्यक ती पूर्वतयारी करून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांचे संचालक व प्रमुख, संलग्न, संचलित व स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थांचे संचालक तसेच विद्यापीठाच्या विविध उपपरिसरांचे समन्वयक व संचालक यांनी ही सूचना सर्व परीक्षार्थी, शिक्षक आणि परीक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभारात ५० ‘फेलो’; स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांसह खाते प्रमुखांच्या दिमतीसाठी नियुक्ती

दिव्यांगांसाठी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित; मुंबईतील ५६ हजारांहून अधिक दिव्यांगांना दिलासा

Mumbai : वांद्रे येथील मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन व सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा

Mumbai : दुकान नोंदणीसाठी सोसायटीच्या एनओसीचा आग्रह धरू नका; हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

'सर्पदंश' अधिसूचित आजार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय