मुंबई विद्यापीठात स्पर्धा परीक्षांसाठी सुवर्णसंधी; मोफत मार्गदर्शन, स्टायपेंडसह प्रवेश प्रक्रिया सुरू 
मुंबई

मुंबई विद्यापीठात स्पर्धा परीक्षांसाठी सुवर्णसंधी; मोफत मार्गदर्शन, स्टायपेंडसह प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलेंसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, आयबीपीएस, टोएफल तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी एक वर्षाच्या प्रिलिम्स कोचिंग बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलेंसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, आयबीपीएस, टोएफल तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी एक वर्षाच्या प्रिलिम्स कोचिंग बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

ही योजना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन यांच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येणार आहे. या प्रक्रियेनंतर उमेदवारांची निवड ऑफलाइन प्रवेश परीक्षेद्वारे केली जाणार असून ही परीक्षा १७ मे रोजी घेण्याचे नियोजन आहे.

दरमहा मिळणार शिकाऊ भत्ता

निवड झालेल्या अनुसूचित जाती, ओबीसी व पीएएम-केअर्स योजनेतील विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार स्टायपेंड दिले जाईल. माहितीसाठी डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स, पहिला मजला, जे. पी. नाईक भवन, मुंबई विद्यापीठ, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे संपर्क साधावा तसेच ९०८२९५०५६० आणि ९०२९७३२३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. संतोष राठोड यांनी केले आहे.

कोण घेऊ शकतो प्रवेश

स्पर्धा परीक्षांच्या एक वर्षाच्या प्रिलिम्स कोचिंग बॅचसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व संरचित मार्गदर्शन, अनुभवी तज्ज्ञांकडून मॅटरिंग, नियमित चाचण्या तसेच वैयक्तिक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अनुसूचित जाती, ओबीसी आणि पीएएम-केअर्स योजनेतील विद्यार्थ्यांना यात प्राधान्य देण्यात येणार असून त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ दिले जाणार आहे.

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

ऑटो एलपीजी वाहन वयोमर्यादा वाढवा; उद्योग संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

अपात्रतेचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला नाही! सहकारी बँक संचालक कालमर्यादेबाबत बँकतज्ज्ञांचे मत

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

सणासुदीत साखर कडू! दर ७० रुपये किलोवर, गूळही महागला; महिन्यात २० रुपयांनी वाढ, शेवया-बत्ताशांचे भावही वाढले