मुंबई विद्यापीठाचे संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रात विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रात विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पदवी स्तरावरील बीकॉम सत्र ६ ची परीक्षा १८ मार्च, बीएस्सी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च, बीए सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. तर बीएस्सी आयटी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित विषयांची परीक्षा १८ मार्च, बीएमएम आणि बीएएमएमसी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च २०२५ रोजी घेण्याचे विद्यापीठामार्फत नियोजित करण्यात आले आहे.

उन्हाळी सत्रात विविध विद्याशाखेअंतर्गत १ लाख ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये विद्याशाखानिहाय मानव्य विज्ञान शाखेसाठी १४ हजार ७२३, वाणिज्य शाखेसाठी ७४ हजार ४८३, विज्ञान २७ हजार १३४, तंत्रज्ञान १३ हजार ०४, विधी ८ हजार ७२५ विद्यार्थी आहेत.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...