'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : बॉयफ्रेंडच्या कौतुकामुळे तरुणीने कापले मैत्रिणीचे केस; व्हिडिओही शूट, तिघींविरुद्ध गुन्हा दाखल

त्याने आपल्या गर्लफ्रेंडशी बोलताना तक्रारदार तरुणीच्या केसांचे कौतुक केले होते आणि तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २१ वर्षीय तरुणीने आपल्या २० वर्षीय मैत्रिणीचे केस जबरदस्तीने कापून त्याचा व्हिडिओ शूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.२५) घडली असून वर्सोवा पोलिसांनी त्याच दिवशी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मैत्रीतील गैरसमजातून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वर्सोवा परिसरात राहणारी विद्यार्थीनी आहे. एका कॉमन मित्रामार्फत तिची आरोपी तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडशी ओळख झाली होती. संबंधित तरुण इंस्टाग्रामद्वारे तक्रारदाराशी चॅटिंग करत असे. दरम्यान, त्याने आपल्या गर्लफ्रेंडशी बोलताना तक्रारदार तरुणीच्या केसांचे कौतुक केले होते आणि तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तक्रारदार आणि त्या तरुणामध्ये केवळ मैत्रीचे संबंध असल्याचे समोर आले आहे.

७ मार्च रोजी आरोपी तरुणी तक्रारदाराच्या घरी आली आणि तिचा मोबाईल तपासला. कोणतेही आक्षेपार्ह चॅट न सापडल्याने तिने तिचे आभार मानले आणि ती तेथून निघून गेली.

मध्यरात्री घडली घटना

२५ मार्चच्या रात्री सुमारे १२.३० वाजता तक्रारदार तरुणी घरी होती. बेल वाजल्यावर तिला वाटले की आईस्क्रीमची डिलिव्हरी ऑर्डर आली आहे. मात्र, दरवाजा उघडताच आरोपी तरुणी तिच्या दोन मैत्रिणींसह उभी असल्याचे दिसले.

त्यानंतर, आरोपीने त्या तरुणीला घराबाहेर ओढले आणि कात्रीने तिचे केस कापायला सुरुवात केली. यावेळी तिच्या दोन मैत्रिणींनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शूट केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार तरुणीने विरोध केल्यावर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे. केस कापल्यानंतर आरोपी काही केस घेऊन तेथून निघून गेली.

पोलिसांत गुन्हा दाखल

तक्रारदार तरुणीने या प्रकाराबाबत वर्सोवा पोलिस ठाण्यात आरोपी आणि तिच्या दोन मैत्रिणींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. "गैरसमजामुळे मैत्रिणीने माझे केस कापले," असे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणी सोशल मीडियावर रील्स बनवत असते. हा प्रकार केवळ स्टंट होता की यामागे अन्य काही हेतू होता, याचा पुढील तपास सुरू आहे.

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड