Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गावदरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवार, २६ नोव्हेंबर आणि २७ नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या पाच विभागांत काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, तर काही परिसरांत २४ तास पाणी कपात करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गावदरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवार, २६ नोव्हेंबर आणि २७ नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या पाच विभागांत काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, तर काही परिसरांत २४ तास पाणी कपात करण्यात येणार आहे.

मुख्य जलवाहिन्या दुरुस्तीचे काम गुरुवारी, सकाळी ९ ते शुक्रवार, २७ नोव्हेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत सलग २४ तास हे चालणार आहे. त्यामुळे जी उत्तर, के दक्षिण, के उत्तर, एच पूर्व आणि एस विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर एस आणि एन विभागांसह काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

  • के दक्षिण व के उत्तर विभाग : कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार मार्ग) आणि मोगरपाडा.

  • एस विभाग : विक्रोळी पश्चिम, कांजूरमार्ग पश्चिम, सूर्यानगर, आंबेडकर चौक, लालबहादूर शास्त्री मार्ग, सनसिटी संकुल, भांडुप पश्चिममधील महाराष्ट्र नगर, कोकण नगर, टेंभीपाडा, सोनापूर, तुळशेतपाडा, साई हिल आणि साई विहार.

  • एन विभाग : अप्पर व लोअर डेपो पाडा, सागर नगर, विक्रोळी पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, फिरोजशाह नगर, गोदरेज कुंपण, मेफेअर इमारती, कैलास संकुल, वाधवा निवासी, प्रेसिडेंशियल टॉवर्स, कल्पतरू संकुल, आर-सिटी मॉल, दामोदर पार्क, श्रेयस सिनेमा, साईनाथ नगर आणि नित्यानंद नगर.

या विभागांमध्ये पूर्णपणे पाणी बंद

  • जी उत्तर : धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, प्रेमनगर, नाईकनगर, धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जास्मिन मिल मार्ग, माहीम फाटक, कुंभारवाडा, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० व ९० फुटी रस्ता, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा आणि महात्मा गांधी मार्ग.

  • के दक्षिण आणि के उत्तर : विजय नगर, मरोळ, मिलिटरी मार्ग, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा, सेव्हन हिल्स रुग्णालय, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिप्झ, मुलगाव डोंगरी, एमआयडीसी मार्ग क्रमांक १ ते २३, कोंडिविटा, महेश्वरी नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, चकाला, मालपा डोंगरी, हनुमान नगर, मरोळ औद्योगिक क्षेत्र, जे. बी. नगर, कांती नगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत आणि पी अँड टी वसाहत. २७ नोव्हेंबरला ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर आणि सहार गाव.

  • एच पूर्व : वांद्रे टर्मिनस येथे २६ आणि २७ नोव्हेंबरला पाणीपुरवठा बंद राहील. २७ नोव्हेंबरला ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहरामपाडा, खेरनगर, निर्मल नगर आणि वांद्रे पूर्व परिसर.

  • एस विभाग : मोरारजी नगर, गौतम नगर, जय भीम नगर, पासपोली गाव, कैलास नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, स्काऊट गाईड, पालिका कर्मचारी वसाहत, पठाणवाडी, महात्मा फुले नगर आणि आरे मार्ग येथे २६ व २७ नोव्हेंबरला पाणीपुरवठा बंद राहील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

अर्थव्यवस्थेची भरभराट, राहुलचा जळफळाट

आजचे राशिभविष्य, २४ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

थंडीच्या दिवसांत चहात तुळशीची पाने टाकताय? आधी हे वाचा! प्रत्येक तुळशीची चव नसते सारखी

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर