मंगळवार, बुधवार पूर्व उपनगरांत पाणीबाणी; जलबोगद्याचे काम, काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार 
मुंबई

Mumbai : मंगळवार, बुधवार पूर्व उपनगरांत पाणीबाणी; जलबोगद्याचे काम, काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. या अंतर्गत १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी व इतर कामे केली जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. या अंतर्गत १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी व इतर कामे केली जाणार आहेत.

या कामांसाठी तुर्भे उच्चस्तरीय जलाशयाची १८०० मिमी आणि निम्नस्तरीय जलाशयाची १२०० मिमी जलवाहिनी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवार, ५ मे रोजी सकाळी १० ते बुधवार, ६ मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत (एकूण ३० तास) केली जाणार आहेत. या कामादरम्यान शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण आणि पूर्व उपनगरातील एल, एम पूर्व, एम पश्चिम व एन विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

अमर महल (हेडगेवार उद्यान) ते वडाळा (प्रतीक्षा नगर) आणि पुढे परळ (एएमटी-१) पर्यंत, तसेच अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय (एएमटी २) आणि पुढे तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे. या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत तुर्भे उच्चस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा करणारी १८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी १८०० मिलिमीटर व्यासाच्या दुसऱ्या जलवाहिनीस जोडली जाणार आहे.

तसेच, या अनुषंगाने इतर जलकामेदेखील करण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा विषयक कामे करण्यासाठी तुर्भे उच्चस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा करणारी १८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि तुर्भे निम्नस्तरीय जलाशयाची १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे.

विधान परिषद निवडणुकीचे नाट्य संपुष्टात; सर्व दहा जण बिनविरोध; पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज

परवानग्यांचे 'बोन्साय'; एकीकडे ३०० कोटी झाडे लावणार, दुसरीकडे वृक्षतोड झाली सोपी

सुप्रिया सुळे यांनी केली तलवार म्यान; 'आता पवारांशी लढणार नाही'

लवकरच वादळ येणार, ट्रम्प यांची नवी धमकी

Maharashtra Din 2026 : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"; महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा