Mumbai : गणपती विसर्जनासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; चर्नी रोडवरील थांब्यांमध्ये तात्पुरते बदल संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : गणपती विसर्जनासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; चर्नी रोडवरील थांब्यांमध्ये तात्पुरते बदल

गणेश विसर्जनासाठी रात्री चर्चगेट–विरार मार्गावर १२ विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : गणेश विसर्जनासाठी रात्री चर्चगेट–विरार मार्गावर १२ विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच चर्नी रोड स्थानकातील लोकलच्या थांब्यांमध्येही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी सहा अशा एकूण १२ विशेष धीम्या लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेटहून विरारकडे रात्री १.१५ ते पहाटे ३.४५ या वेळेत, तर विरारहून चर्चगेटकडे रात्री १२.१५ ते पहाटे ३.०० या वेळेत या विशेष लोकल धावतील. चर्चगेटहून विरारसाठी रात्री १.१५, रात्री १.४५, रात्री २.१५, रात्री २.५५, रात्री ३.१५ आणि रात्री ३.४५ वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, रात्री १२.३०, रात्री १.१०, रात्री १.३०, रात्री २ आणि रात्री ३ वाजता लोकल सुटेल.

भाविकांची सुरक्षिततेसाठी बदल

२५ सप्टेंबर रोजी गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्यादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चर्नी रोड स्थानकावरील लोकल सेवांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. चर्नी रोड स्थानकावरील लोकल सेवांच्या वेळापत्रकात आणि थांब्यांमध्ये तात्पुरता बदल केला आहे. सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या गर्दीच्या वेळेत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या ३७ जलद लोकल सेवांना मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर चर्नी रोडसह थांबा देण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, सायंकाळी ६ ते रात्री ११.३० या वेळेत चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एकूण ८४ लोकल चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर थांबणार नाहीत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण : पार्थ पवारांविरुध्द गुन्ह्यासाठी याचिका

Ulhasnagar : स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांसाठी रणधुमाळी; न्यायालयाच्या दणक्यानंतर निवडणुकीचा बिगुल, २४ सप्टेंबरला विशेष महासभा

MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांनी दिली सरकारला एक आठवड्याची मुदत

कुनो अभयारण्यात चित्त्याच्या चार पिलांचा जन्म