मुंबई

Mumbai : नियमबाह्य भाडे आकारणीला चाप; रिक्षा-टॅक्सीचालकांच्या तक्रारीसाठी लवकरच व्हाॅट्सॲप नंबर

प्रवाशांनी आपल्या गैरसोयीबाबत या नंबरवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई : प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी तसेच ओला-उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाॅट्सॲप नंबर प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोयीबाबत या नंबरवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

वांद्रे पूर्व मतदार संघातील बांद्रा, खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सीचालकांच्या अरेरावी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वांद्रे पूर्व भागाचे लोकप्रतिनिधी वरुण सरदेसाई व मोटार परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा, खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सीचालकांची अरेरावी सहन करावी लागते. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात. गैरवर्तन करतात, तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

सध्या अंधेरी प्रादेशिक विभागासाठी ९९२०२४०२०२ हा व्हाॅट्सॲप क्रमांक प्रदर्शित करण्यात आला आहे. तथापि, प्रादेशिक विभाग निहाय व्हाॅट्सॲप हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पुर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाॅट्सॲप एका आठवड्यात प्रदर्शित करावा व त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हाॅट्सॲप नंबरवर करतील.

गरज पडल्यास परवानाही रद्द

मोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे ज्या भागात अशाप्रकारे प्रवाशांना रिक्षाचालकाकडून त्रास होतो तेथे वारंवार ग्रस्त घालावी. तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सीचालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी