Mumbai : वरळीत BEST च्या धडकेत महिला ठार; कंत्राटी बससेवेचा आणखी एक अपघात 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : वरळीत BEST च्या धडकेत महिला ठार; कंत्राटी बससेवेचा आणखी एक अपघात

वरळी येथील एसटी कार्यालयाजवळ सोमवारी सकाळी बेस्ट बसच्या चाकाखाली सापडून ६० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली, तर ब्रीच कँडी येथे बेस्ट बसमध्ये ४६ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला.

Swapnil S

मुंबई : वरळी येथील एसटी कार्यालयाजवळ सोमवारी सकाळी बेस्ट बसच्या चाकाखाली सापडून ६० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली, तर ब्रीच कँडी येथे बेस्ट बसमध्ये ४६ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना नायर रुग्णालयात नेले असता दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भायखळा स्थानक ते लोटस या मार्गावर धावणारी ए-१५४/४२ क्रमांकाची बेस्ट बस सोमवारी सकाळी सुमारे ११.२५ वाजता वरळी येथील एसटी कार्यालयाजवळील सिग्नलवर थांबली होती. त्याचवेळी बसच्या बाजूला एक टॅक्सी उभी होती. सिग्नल लाल असताना टॅक्सीमधून वनमाला आर. साबळे (६०) या महिला खाली उतरत होत्या. सिग्नल हिरवा होताच बस चालकाने बस पुढे घेतली. यावेळी महिला बसच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाच्या खाली आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने कान व डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला होता. या घटनेनंतर बसवाहकाने तत्काळ जखमी महिलेला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी दुपारी १२.१५ वाजता त्यांना मृत घोषित केले.

या अपघाताची माहिती मिळताच वरळी विभागाचे सहाय्यक डेपो व्यवस्थापक, अपघात विभागाचे अधिकारी, बेस्टचे संबंधित अधिकारी तसेच वेट वीज कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. अपघाताबाबत पुढील चौकशी सुरु आहे.

बसमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू

ब्रीच कँडी रुग्णालयाहून भायखळा स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या ए-७७/३३ मार्गावरील बेस्ट बस टाटा गार्डन, मुकेश चौक परिसरात आली असता बस मधून प्रवास करणारे मृत्यूंजय नायक (४६) यांना हृदयविकाराचा झटका आला. या प्रवाशाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच बसवाहकाने त्यांची विचारपूस केली. मात्र ते कोणताही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे बस थेट नायर रुग्णालयात नेण्यात आली. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी रात्री ८.३० वाजता त्यांना मृत घोषित केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

MPSC Paper Leak : विद्यार्थ्यांचा आक्रोश! सततच्या पेपरफुटीविरोधात पुण्यात तीव्र संताप

MPSC Paper Leak : ठोस पुरावा दिल्यास पद सोडणार; भीमनवार यांचे प्रत्युत्तर

लिंकिंग रोड अतिक्रमणमुक्त; वांद्रे येथे नॅशनल कॉलेजजवळील पदपथावरील स्टॉल्स हटविले, BMC च्या 'एच' पश्चिम विभागाची धडक कारवाई

विवादे नैव कर्तव्यं प्रधानैः सह कर्हिचित्

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत