FPJ
मुंबई

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक, नेत्यांची नावे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात काही बांधकाम व्यावसायिक आणि राजकारण्यांची नावे घेतली आहेत.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात काही बांधकाम व्यावसायिक आणि राजकारण्यांची नावे घेतली आहेत. त्यांनी वांद्रे येथील झोपडपट्टी विकास प्रकल्पांशी संबंधित समस्यांकडे पोलिसांचे लक्ष वेधले आहे. एका विकासकाने त्यांच्या वडिलांविरोधात अपशब्द वापरले होते, असे झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना सांगितले.

झिशान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की, अनेक विकासक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांसाठी सतत त्यांच्या वडिलांच्या संपर्कात राहत असत. त्यांचा हा जबाब सिद्दीकी हत्येशी संबंधित दाखल केलेल्या आरोपपत्राचा भाग आहे.

काही विकासक माझ्या वडिलांच्या नियमित संपर्कात होते. माझ्या वडिलांना त्यांच्या दैनंदिन कामांविषयी डायरी लिहिण्याची सवय होती. हत्येच्या दिवशी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान मोहित कांबोज (भाजप कार्यकर्ता) यांनी माझ्या वडिलांशी वांद्रे येथील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत भेट घेण्यासाठी व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला होता, असे झिशान सिद्दीकी यांनी जबाबात नमूद केले आहे.

माझ्या वडिलांच्या विरोधात खोटा खटला दाखल केला होता, असेही त्यांनी सांगितले.

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय

'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक

'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडक

निर्भेळ यशाचे लक्ष्य; गोलंदाजांवर पुन्हा लक्ष! भारताचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना