मुंबई

The Kashmir Files : 'दि काश्मीर फाईल्स' वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; म्हणाले तो इस्रायली असल्याने...

इस्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी 'दि काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) वर केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचा सरकारला टोला

प्रतिनिधी

गोव्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (IFFI 2022) हेड ज्युरी असलेले इस्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी 'दि काश्मीर फाईल्स'चे वर्णन 'अश्लील प्रोपेगेंडा' असल्याचे म्हंटले. यावर देशभरातून अनेकांनी आपले मते मांडली. आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीदेखील उडी घेतली आहे. यापूर्वीही त्यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'दि काश्मीर फाईल्स' हा भाजपचा चित्रपट असल्याची टीका केली होती.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे की, "तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी 'काश्मीर फाईल्स' चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण 'प्रचारकी आणि गलिच्छ' चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदव लॅपिडने सणसणीत चपराक लगावली. " असा टोला त्यांनी लगावला आहे.

गोव्यातील पणजीमध्ये सुरु असलेल्या इफ्फीमध्ये नदव लॅपिड यांनी म्हंटले की, "आम्ही सर्व नाराज आहोत. हा चित्रपट आम्हाला प्रोपगंडा आणि वलगर वाटला. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित महोत्सवासाठी काश्मीर फाइल्स योग्य नाही. मी व्यासपीठावर माझ्या भावना मोकळेपणाने सांगू शकतो. ही एक महत्त्वाची चर्चा आहे, जी न डगमगता व्हायला हवी. कला आणि जीवनासाठी ते आवश्यक आहे."

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण