नायर रुग्णालयातील सेवा कार्यान्वित; महापौरांसह विविध मान्यवरांनी केली पाहणी  
मुंबई

Mumbai : नायर रुग्णालयातील सेवा कार्यान्वित; महापौरांसह विविध मान्यवरांनी केली पाहणी

बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित व मुंबई सेंट्रलस्थित बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयातील अत्याधुनिक आणि नवनिर्मित अशा ‘अपघात आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग संकुल’ कार्यान्वित करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित व मुंबई सेंट्रलस्थित बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयातील अत्याधुनिक आणि नवनिर्मित अशा ‘अपघात आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग संकुल’ कार्यान्वित करण्यात आला आहे.


नायर रुग्णालयातील सदर अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा संकुलाचे समारंभपूर्वक लोकार्पण करण्याचे नियोजित होते. तथापि, कतार देशाचे ‘पिता अमीर’, माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे १२ जुलै २०२६ रोजी निधन झाले. त्यामुळे केंद्र शासनाने भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असल्याने नायर रुग्णालयातील सदर लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला. यावेळी शेख हमद बिन खलिफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वैद्यकीय सेवा सुरू करण्याची प्राथमिकता व आवश्यकता पाहता, महापौर रितू तावडे यांनी या नवीन संकुलाची पाहणी केली व त्यानंतर सेवा कार्यान्वित करण्यात आली.

असे आहे संकुल

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात नॅशनल मेडिकल कमिशन यांच्याद्वारे विहित किमान मानक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी नायर रुग्णालयात अत्याधुनिक अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.

नायर रुग्णालय विस्तार अंतर्गत हाती घेतलेल्या ‘प्राइम प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट’मधील हा एक प्रमुख आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या विस्तार योजनेत आगामी ऑन्कोलॉजी (कॅन्सर) इमारत, निवासी वैद्यकीय अधिकारी निवासस्थाने आणि एल आकाराच्या इमारतीचाही समावेश आहे.

२४ तास अखंडित कार्यरत राहणारा अपघात विभाग आणि प्रगत आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांचे हे एकत्रीकरण रुग्णांना जलद व उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार देण्यास सक्षम आहे.

इमारतीचे बांधकाम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व वैधानिक ना-हरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतर २५ जून २०२६ रोजी हे संकुल नायर रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भारतीय तांदळाला जागतिक स्तरावर मागणी; १३८ देशांतील ३,३१७ खरेदीदारांची नोंदणी

Nepal Floods : आई-वडील महापुरात बेपत्ता, तरीही NEET-PG परीक्षा दिली; दीड तास रडतच सोडवला पेपर

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस; प्रकृतीबाबत चिंता वाढली, आज सरकारचे शिष्टमंडळ भेटणार

गणपतीला कोकणात जाणं झालं महाग! रेल्वे-ST फुल्ल; खासगी बसचे तिकीट थेट ४ ते ५ हजारांवर

Mumbai Local : मध्यरात्री लेडीज डब्यात एकटी महिला; 'सिक्युरिटी नाही, अचानक कोणी आलं तर काय करू?' VIDEO व्हायरल