Photo: alman Ansari
मुंबई

यंदा ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींना बंदी नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

यंदाच्या गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्तींवर बंदी नसेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Swapnil S

ऊर्वी महाजनी/मुंबई

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर आलेला असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने मूर्तिकारांना दिलासा देणारा निकाल शुक्रवारी दिला. यंदाच्या गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्तींवर बंदी नसेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

ठाण्यातील रोहित जोशी व शाडू आणि मातीच्या मूर्तिकारांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत राज्य सरकारसह सर्व पालिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रशासनाने ‘पीओपी’ बंदीचे पालन करण्यासाठी कोणती पावले उचलली ते प्रतिज्ञापत्राद्वारे कळविण्याचे आदेश देण्यात जावणी करताना विश्वासात घेतले आहे. शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी ६११ टन माती वितरीत केली आहे.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको