निवासी डॉक्टरांच्या संपादरम्यान जे. जे. रुग्णालयाच्या ओपीडीतील दृश्य. छायाचित्र : सलमान अन्सारी
मुंबई

Mumbai : 'ओपीडी' सेवा कोलमडली! सात हजार निवासी डॉक्टर संपावर; रुग्णांच्या लांबच लांब रांगा

होमियोपथी (बीएचएमएस) पदवीधरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एमएमसी) सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील सुमारे ७ हजार निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामुळे बुधवारी मुंबईसह राज्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा पूर्णपणे कोलमडली.

अमित श्रीवास्तव

मुंबई : होमियोपथी (बीएचएमएस) पदवीधरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एमएमसी) सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील सुमारे ७ हजार निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामुळे बुधवारी मुंबईसह राज्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा पूर्णपणे कोलमडली.

आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि शस्त्रक्रिया सुरू असल्या तरी अनेक रुग्णालयांमध्ये ओपीडीतील उपस्थिती तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घटली. यामुळे शेकडो रुग्णांना उपचारासाठी तासनतास ताटकळत राहावे लागले, तर अनेकांना उपचाराविनाच घरी परतावे लागले.

वैद्यकीय सेवांवर मोठा परिणाम

‘सेंट्रल मार्ड’च्या बॅनरखाली निवासी डॉक्टरांनी ओपीडी आणि इतर बिगर-आपत्कालीन सेवांवर बहिष्कार टाकत रुग्णालय परिसरात निदर्शने केली. मॉडर्न फार्मकोलॉजीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या ‘बीएचएमएस’ डॉक्टरांसाठी स्वतंत्र नोंदणी पुस्तक तयार करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. रुग्णसेवेचा खोळंबा टाळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने ज्येष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुखांना तैनात केले होते. परंतु मनुष्यबळ कमी पडल्याने नेहमीच्या वैद्यकीय सेवांवर मोठा परिणाम झाला. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दररोज सरासरी २,७१३ रुग्ण येणाऱ्या सायन रुग्णालयात बुधवारी केवळ १,१९७ ओपीडी रुग्णांची नोंद झाली’.

ओपीडीतील रुग्णांची संख्याही घटली...

जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले की, ‘ओपीडीतील रुग्णांची संख्या नेहमीच्या १,७३५ वरून १,३३३ पर्यंत खाली आली. तसेच रुग्णालयातील भरतीमध्येही मोठी घट झाली असून रोजच्या सरासरी १०२ रुग्णांऐवजी केवळ १२ रुग्णांना दाखल करण्यात आले, तर दिवसभरात केवळ १४ लहान-मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या’. नायर रुग्णालयातही रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून ओपीडीतील उपस्थिती सुमारे १,०३२ पर्यंत खाली आली, जी नेहमीच्या दैनंदिन प्रमाणाच्या निम्म्यावर आहे. केईएम रुग्णालयातही अशाच प्रकारचा फटका बसल्याचे समोर आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश