Palghar : कारने चिरडल्याने १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू 
मुंबई

Palghar : कारने चिरडल्याने १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव इको कारने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

Swapnil S

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव इको कारने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सोनम युवराज खरपडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता सहावीमध्ये शिकत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या आवारात पांढऱ्या रंगाची कार उभी होती. आडोशी येथील शंकर किसन घाटाळ (३६) याने चालकाकडून चावी घेऊन कार सुरू केली. कार सुरू करताच त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव कार शाळेच्या आवारात खेळत व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या दिशेने गेली. इतर मुलींनी प्रसंगावधान राखून बाजूला धाव घेतली; मात्र सोनमला बाजूला होता न आल्याने कारने तिला जोरदार धडक दिली. गंभीर दुखापतीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी सोनमचे वडील युवराज खरपडे यांच्या फिर्यादीवरून मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मातेकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. शाळेसाठी कंपाऊंड वॉलचा प्रस्ताव संबंधित योजनेतून तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना राजीव गांधी अपघात विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : भाडेवाढीने प्रवासी संतापले; टॅक्सी किमान भाडे ३३, रिक्षा २७ रुपये

Pune : कुकरच्या दहा शिट्ट्या, तरीही वाटाणे शिजेनात; अंगणवाडीतील सेविकेची तक्रार, आधी निलंबन, नंतर निर्णय मागे

भटक्या कुत्र्यांना डिजिटल ओळख; QR कोडयुक्त परावर्तित कॉलर, रेबीजमुक्त मुंबईच्या दिशेने BMC चा पुढाकार