पालघर जिल्ह्यात आज 'रेड अलर्ट'; शाळांना सुट्टी; पुढील पाच दिवस मुसळधार  
मुंबई

पालघर जिल्ह्यात आज 'रेड अलर्ट'; शाळांना सुट्टी; पुढील पाच दिवस मुसळधार

पालघर जिल्ह्यात २ जुलै रोजी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील पाच दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Swapnil S

पालघर : पालघर जिल्ह्यात २ जुलै रोजी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील पाच दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना २ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय संभाव्य अतिवृष्टी आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारीनी आदेशात म्हटले आहें.

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि समुद्रकिनाऱ्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके