मुंबई

Mumbai : पीडीएस लिमिटेडच्या संचालकाविरुद्ध २० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

अंधेरी पोलिसांनी 'पीडीएस लिमिटेड'च्या बांगलादेशातील प्रमुखाविरुद्ध सुमारे २० कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीपक कसाना असे आरोपीचे नाव असून त्याने खरेदी कोटेशनमधील तपशील लपवून कंपनीच्या निधीचा वैयक्तिक कामासाठी वापर केल्याचा आरोप आहे.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई

अंधेरी पोलिसांनी 'पीडीएस लिमिटेड'च्या बांगलादेशातील प्रमुखाविरुद्ध सुमारे २० कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीपक कसाना असे आरोपीचे नाव असून त्याने खरेदी कोटेशनमधील तपशील लपवून कंपनीच्या निधीचा वैयक्तिक कामासाठी वापर केल्याचा आरोप आहे. १८ एप्रिलला हा गुन्हा दाखल करण्यात आला.

अंधेरी पश्चिम येथे राहणारे अभिषेक कनोई (४२) हे 'पीडीएस लिमिटेड'मध्ये ग्रुप लीगल हेड म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीचे कार्यालय अंधेरी पूर्व येथे असून ती कापड उत्पादन आणि व्यापारात सक्रिय आहे. बांगलादेशातील ढाका येथे कंपनीचे कार्यालय असून तेथे सुमारे ३५० कर्मचारी काम करतात.

काय आहे आरोप

ढाका शाखेत अनियमितता होत असल्याचा संशय आल्याने कंपनीने २०२५ मध्ये कसानाला कामावरून काढले. त्यानंतर कंपनीने केलेल्या ऑडिटमध्ये कसानाने २०२२ ते २०२५ दरम्यान सुमारे २५ कोटी रुपयांचे फुगवलेले व्यवहार केले. त्याने कंपनीला खोटी कोटेशन सादर करून जास्त किमतीच्या कोटेशनना मंजुरी दिली आणि त्यातील अतिरिक्त रक्कम स्वतःसाठी वापरली. कसाना आणि सहकारी उत्तम कुमार नहा यांनी कंपनीची गोपनीय माहिती चोरत ग्राहकांना दिशाभूल करणारे ई मेल केले आणि कंपनीचे नुकसान केले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स