मुंबई

बॅनर लावल्याने महापालिकेत जागा मिळत नाहीत!किशोरी पेडणेकर यांचा टोला

तुम्ही प्रचंड खोटे बोलून आणि आभास निर्माण करून सेनेची नाळ लोकांशी तोडण्याचा प्रयत्न करत आहात

प्रतिनिधी

भाजप नेते आशिष शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. या बॅनरवर ‘मिशन १५०’ असे लिहिण्यात आले आहे. यावर नुसते बॅनर लावून महापालिकेत १५० जागा मिळत नाहीत. त्यासाठी जनतेशी नाळ असावी लागते, असा टोला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांना लगावला आहे.

भाजपा मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री शेलार यांचा ३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. या निमित्त किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मिशन १५० असे बॅनर लावले म्हणजे १५० जागा झोळीत आल्या असे होत नाही, त्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असायला हवी, असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे. तुम्ही प्रचंड खोटे बोलून आणि आभास निर्माण करून सेनेची नाळ लोकांशी तोडण्याचा प्रयत्न करत आहात, असेही पेडणेकर म्हणाल्या. आम्ही गर्दीवर अवलंबून नाही, निष्ठावंत मेळाव्याला येतीलच, असा दावा त्यांनी केला. आम्ही नेहमी गर्दीचा विक्रम मोडत आलो आहोत. शिंदे गटाच्या आमदारांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या का असतात असा प्रश्न उपस्थित करत कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या सभेला जाणार असा टोला पेडणेकर यांनी लगावला.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव