पदव्युत्तर अभ्यासक्रमात पहिल्यांदाच चौथे वर्ष ऑनर्स; ऑनर्स विथ रिसर्चचा पर्याय, ३ जूनला पहिली गुणवत्ता यादी  
मुंबई

पदव्युत्तर अभ्यासक्रमात पहिल्यांदाच चौथे वर्ष ऑनर्स; ऑनर्स विथ रिसर्चचा पर्याय, ३ जूनला पहिली गुणवत्ता यादी

मुंबई विद्यापीठाने सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाने सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच चौथे वर्ष ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्चचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांची पहिली गुणवत्ता यादी ३ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल. वेळापत्रकानुसार ९ ते २६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे तर विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी २८ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी २९ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता जाहीर होईल. यावर विद्यार्थी १ जून पर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत तक्रार करू शकतील.

  • पहिली गुणवत्ता यादी ३ जूनला संध्याकाळी ६ वाजता जाहीर होईल. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ४ ते ६ जूनला संध्याकाळी ३ वाजेपर्यंत ऑनलाईन शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे. प्रवेशाची द्वितीय गुणवत्ता यादी ८ जूनला संध्याकाळी ६ वाजता जाहीर होईल. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ९ ते ११ जून रोजी संध्याकाळी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन शुल्क भरता येणार आहे तर नियमित वर्ग १३ जूनपासून सुरू होतील.

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक पदव्युत्तर विभागात तसेच सलग्नित महाविद्यालयात पदवीचे चौथे वर्ष ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्चचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानुसार १ वर्षीय पीजी डिप्लोमा, २ वर्षीय पदव्युत्तर पदवी आणि पदवीचे चौथे वर्ष ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्चचा अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होता येईल.

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ज्या विद्यार्थ्यांनी पदवीचे ३ वर्षे पूर्ण केलेत अशा विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी (ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च) साठी प्रवेश घेता येईल. राज्यातील तसेच राज्याबाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना या सुवर्ण संधीचा फायदा घेता येईल.

मुंबई पोलीस दलाची मोठी पुनर्रचना; दोन नवीन झोनची निर्मिती, पाच प्रादेशिक विभाग, १५ झोन, चार नवीन पोलीस ठाण्यांनाही मंजुरी

पोहणेही झाले आता महाग! BMC च्या जलतरण तलावाच्या शुल्कात वाढ; सभासदांना आता ५ टक्के अधिक मोजावे लागणार

रुपाली चाकणकरांची SITकडून ६ तास चौकशी; भोंदू अशोक खरातप्रकरणी आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

Mumbai : मोटरमनना सिग्नलची अचूक माहिती समजणार; अपघात टाळण्यास होणार मदत

थलपती विजय तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; चेन्नईतील राजभवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात पार पडला शपथविधी