सरकारी शाळांसाठी चाकरमानी एकवटले; मुंबईत ५ ऑक्टोबरला आंदोलन प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

सरकारी शाळांसाठी चाकरमानी एकवटले; मुंबईत ५ ऑक्टोबरला आंदोलन

मुंबईच्या आझाद मैदानावर येत्या ५ ऑक्टोबर पासून ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ बेमुदत धरणे आंदोलन होत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर येत्या ५ ऑक्टोबर पासून ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ बेमुदत धरणे आंदोलन होत आहे. या आंदोलनात सर्व ताकदीनिशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार कोकणातील मुंबईकर चाकरमान्यांनी केला आहे.

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ आंदोलनाच्या तयारीसाठी शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच महाराष्ट्राच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी, परळ येथे मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील या बैठकीला 'शाळा वाचवा ,शिक्षण वाचवा ' मंच महाराष्ट्राचे निमंत्रक संजय वेतुरेकर यांनी मार्गदर्शन केले.

‘सरकार भांडवलदार आणि शिक्षण सम्राट यांच्या हितासाठी सरकारी शाळा बंद करत आहे. शाळा बंद झाल्या तर गाव खेड्यातल्या आणि शहर महानगरातल्या कष्टकरी वर्गातील मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहेत मुलींच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न येत्या काळात उभा राहील उभा राहील. येत्या ५ ऑक्टोबर पासून मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी 'शाळा वाचवा शिक्षण वाचवा' बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आम्ही कुणाही पक्षात सहभागी होणार नाही; शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा

भिवंडी : भाजपच्या माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; सामूहिक अत्याचार प्रकरणी अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

Pune : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरात घुसखोरी; घुसखोर तरुणाला अटक

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रे यांचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द; ३ दिवसांत शरण येण्याचे दिले आदेश