मुंबई

Mumbai : भाजप समर्थनाचे राज ठाकरेंकडून खंडन; एमआयजी क्लबमध्ये मनसेची बैठक

कल्याण-डोंबिवलीप्रमाणे महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना मुंबईत महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्ताचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी खंडन केले. मी सांगतो ना, नाही म्हणजे नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजप पाठिंब्याची चर्चा फेटाळून लावली.

Swapnil S

मुंबई : कल्याण-डोंबिवलीप्रमाणे महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना मुंबईत महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्ताचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी खंडन केले. मी सांगतो ना, नाही म्हणजे नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजप पाठिंब्याची चर्चा फेटाळून लावली.

मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षाकडून नवनिर्वाचित नगरसेवकांची गटनोंदणी सुरू आहे. ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असून मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. मनसेने कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतही मनसे भाजपला समर्थन देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

पराभूत उमेदवारांना केले मार्गदर्शन

राज ठाकरे यांनी सोमवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीवेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी आपला पक्ष मुंबईत भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची कारणे जाणून घेतली. निवडणुकीची जबाबदारी ज्या पदाधिकाऱ्यांवर होती, त्यांची झाडाझडती घेतली.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन