रवीना टंडनच्या आईच्या घरातील चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक; २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने केले हस्तगत 
मुंबई

रवीना टंडनच्या आईच्या घरातील चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक; २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने केले हस्तगत

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरातून २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ४८ वर्षीय मोलकरणीला अटक केली आहे. राशी छाब्रिया असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव असून, तिला रवीना टंडन यांच्या आईची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवण्यात आले होते.

Swapnil S

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरातून २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ४८ वर्षीय मोलकरणीला अटक केली आहे. राशी छाब्रिया असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव असून, तिला रवीना टंडन यांच्या आईची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवण्यात आले होते. जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या.

आरोपी महिला २०२० पासून टंडन कुटुंबाच्या संपर्कात होती आणि तिने हळूहळू कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. ती रवीना टंडन यांच्या ८६ वर्षीय वृद्ध आईची काळजी घेण्यास मदत करायची, तसेच त्यांच्यासाठी जेवणही बनवायची. घरात नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने फिर्यादीच्या खोलीतील कपाटातील दागिने चोरले होते.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा