साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरण : कंत्राटदाराचे घूमजाव; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू  
मुंबई

साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरण : कंत्राटदाराचे घूमजाव; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू

कुर्ला-साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाला.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे/मुंबई

कुर्ला-साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराने महापालिकेच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देत ‘त्या ठिकाणी माझे कोणतेही काम सुरू नव्हते,’ असे घूमजाव केले आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित कामगारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हे स्पष्टीकरण महापालिकेने अमान्य केले असून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२ जुलै रोजी एल. वॉर्डमधील खैरानी रोड परिसरात मलनिस्सारण प्रचालन विभागाच्या अखत्यारितील मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असताना अस्लम इसाक शेख (५५) हे मोबाईलवर बोलत पायी जात होते. मॅनहोलजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा तोल जाऊन ते उघड्या मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एल. वॉर्डच्या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली