मुंबई

भारतीय बाजारात सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ

वृत्तसंस्था

जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांनंतर सोमवारी भारतीय बाजाराने सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक टक्के वाढ होऊन उत्तम कामगिरी केली. सोमवारी सेन्सेक्स ७६०.३७ अंकांच्या उसळीसह ५४,५२१ वर बंद झाला, तर निफ्टी २२९ अंकांनी वाढून १६,२७८ वर बंद झाला. सोमवारच्या बाजारात आयटी, धातू, तेल आणि वायू तसेच बॅँकिंग समभागांमध्ये जोरदार वाढ झाली आहे.

आयटी आणि धातू समभागात दोन ते तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. औद्योगिक धातूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, देशातील रिअल इस्टेट क्षेत्राला संभाव्य संकटापासून वाचवण्यासाठी चिनी नियामकाने केलेल्या उपाययोजनांनंतर भारतीय बाजारात धातूच्या किमतीत वाढ झाली आहे.

व्यवहाराच्या सलग दुसऱ्या सत्रात दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ७६०.३७ अंक किंवा १.४१ टक्के वधारुन ५४,५२१.१५ वर बंद झाला. दिवसभरात तो ७९५.८८ अंक किंवा १.४८ टक्के ५३,७६०.७८ या कमाल पातळीवर गेला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २२९.३० अंक किंवा १.४३ टक्के वाढून १६,२७८.५० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात वाढ झाली. तर डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी बँक, मारुती, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचडीएफसी यांच्या समभागात घट झाली.

आशियाई बाजारात सेऊल, शांघायमध्ये तेजी होती. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत तर अमेरिकन बाजारात सकारात्मक वाढ झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड २.१८ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव १०३.४ अमेरिकन डॉलर्स झाला.

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स शुक्रवारी ३४४.६३ अंक किंवा ०.६५ टक्का वाढून ५३,७६०.७८ आणि निफ्टी ११०.५५ अंक किंवा ०.६९ टक्का वाढून १६,०४९.२० वर बंद होता.

विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पुन्हा विक्रीचा मारा झाल्याने शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारातून १,४६९.३६ कोटींच्या स्मभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून आले.

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती