मुंबई

मराठी मोर्चाला परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी

मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांची मुस्कटदाबी करून त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारणारे मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

Swapnil S

भाईंदर : मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांची मुस्कटदाबी करून त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारणारे मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलीस आयुक्तपदी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पांडे यांचा प्रशासकीय सेवा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही भाजपप्रणित असलेल्या पोलीस आयुक्तांना बेकायदेशीररित्या मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांच्यासोबत मीरा-भाईंदर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनाही मुदतवाढ देण्यात आली होती. पोलीस आयुक्तांनी मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी मागूनही ती दिली नाही, मात्र अमराठी लोकांच्या विनापरवानगी मोर्चाला त्यांनी रान मोकळे करून दिले होते. तसेच मराठी माणसांवर त्यांनी तत्परतेने गुन्हे दाखल केले.

मीरा-भाईंदरमध्ये भाजप आमदाराने परप्रांतीय व्यापाऱ्यांचा विनापरवानगी मोर्चा काढला होता, त्याला कुठेही अडवण्यात आले नाही किंवा त्यांना नोटिसा दिल्या नाहीत. उलट मोर्चा झाल्यानंतर तीन दिवसांनी नवघर पोलीस ठाण्यात मराठी लोकांचा वाढता रोष झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, मराठी लोकांचा मोर्चा निघाल्यानंतर रात्री लगेच ३०० ते ३५० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर पोलिसांची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. विरोधकांनीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत