दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात  
मुंबई

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

दक्षिण मुंबईतील 'आकांक्षी शौचालय' प्रकल्पाचे सुरु असलेले बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे तसेच आकांक्षी शौचालय संदर्भातील प्रलंबित चौकशी अहवाल त्वरित सादर करावा आणि सरकारी निर्देशांचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.‌

Swapnil S

मुंबई : दक्षिण मुंबईतील 'आकांक्षी शौचालय' प्रकल्पाचे सुरु असलेले बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे तसेच आकांक्षी शौचालय संदर्भातील प्रलंबित चौकशी अहवाल त्वरित सादर करावा आणि सरकारी निर्देशांचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.‌

दक्षिण मुंबईतील 'आकांक्षी शौचालय' प्रकल्पाबाबत जुलै २०२५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाचे हे गंभीर उल्लंघन आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व कामे स्थगित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश असूनही प्रत्यक्षात काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे राज्य सरकारच्या आदेशांचा उघडपणे अवमान असून, विशेषाधिकार भंगाचा विषय ठरू शकतो, असे मकरंद नार्वेकर यांनी सांगितले. त्यामुळे सरकारी आदेशांचे उल्लंघन करून प्रकल्प पुढे नेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना मकरंद नार्वेकर यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही विलंब न करता सर्व बांधकाम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मुंबई पालिकेला २,५८७ कोटींचा GST परतावा; राज्यातील २९ पालिकांना नुकसानभरपाई अनुदानापोटी ५,५३२.२७ कोटी

मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच आता विमान प्रवास; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द

Weather Update : येत्या चार दिवसांत अंदमानात पाऊस

Mumbai : व्हिडीओ वॉलचे काम काळ्या यादीतील कंत्राटदाराला? ‘स्थायी’त सुधारित प्रस्ताव येणार

भुर्दंड जनतेला का? - राज ठाकरे