प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल; मध्य रेल्वेचा मतदार, निवडणूक कर्मचाऱ्यांना दिलासा

Maharashtra assembly elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचारी आणि मतदार यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९-२० नोव्हेंबरला पहाटे आणि २०-२१ नोव्हेंबरच्या रात्री विशेष उपनगरीय लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचारी आणि मतदार यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९-२० नोव्हेंबरला पहाटे आणि २०-२१ नोव्हेंबरच्या रात्री विशेष उपनगरीय लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर मतदान केंद्रांवर पोहचावे लागते. तर मतदानानंतर मतपेट्या जमा करून घरी जाण्यास बराच उशीर होतो. या दरम्यान रेल्वे, बस बंद झाल्यास निवडणूक कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होते. निवडणूक कर्मचारी आणि मतदार यांच्यासाठी मध्य रेल्वेने विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९-२० नोव्हेंबरला रात्री मुख्य मार्गावर डाऊन दिशेने विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

कल्याण विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ३ वाजता सुटेल. ही लोकल कल्याण येथे ४:३० वाजता पोहोचेल. अप मार्गावर कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कल्याण येथून पहाटे ३ वाजता सुटेल. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४:३० वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ३ वाजता सुटेल. ही लोकल पनवेल येथे सकाळी ४:२० वाजता पोहोचेल. हार्बर अप मार्गावर पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल चालविण्यात येईल. ही लोकल पनवेल येथून पहाटे ३ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४:२० वाजता पोहोचेल.

बुधवार-गुरुवार रात्री मुख्य मार्गावर डाऊन दिशेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष लोकल चालविण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १:१० वाजता सुटेल. ही गाडी कल्याण येथे २,४० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २:३० वाजता कल्याण लोकल चालविण्यात येईल. ही लोकल कल्याणला ४ वाजता पोहोचेल.

कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल कल्याणहून रात्री १ वाजता सुटेल. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २:३० वाजता पोहोचेल. कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कल्याण येथून रात्री २ वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३:३० वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १:४० वाजता सुटेल. ही लोकल पनवेल येथे ३ वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २:५० वाजता सुटेल. ही गाडी पनवेल येथे ४:१० वाजता पोहोचेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष लोकल पनवेल येथून रात्री १ वाजता सुटेल.

ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २:२० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्पेशल लोकल पनवेल येथून रात्री २:३० वाजता सुटेल. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३:५० वाजता पोहोचेल.

Mumbai : पाणी टँकरचालकांचा उद्यापासून संप; बडे टॉवर, कार्यालये यांना फटका बसण्याची भीती

खिशाला कात्री! केस कापण्यापासून दाढीपर्यंत सर्व महागले; नवे दर जाणून घ्या

Navi Mumbai : "कित्येक रात्री झोपलेच नाही" म्हणत महिलेचा उद्रेक; रात्रीच्या वीजखंडितीने नागरिक त्रस्त, Video

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

MPSC च्या गुणवंताना खासगी नोकरीची संधी; UPSC च्या धर्तीवर निर्णय