Mumbai : डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीवरील स्थगिती उठली; प्राजक्ता वर्मा यांची मुंबई महापालिकेत बदली 
मुंबई

Mumbai : डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीवरील स्थगिती उठली; प्राजक्ता वर्मा यांची मुंबई महापालिकेत बदली

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीवरील स्थगिती मंगळवारी उठवण्यात आली.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीवरील स्थगिती मंगळवारी उठवण्यात आली. पूर्वीच्या आदेशानुसार डॉ. जोशी यांची बदली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर दिल्लीत प्रतिनियुक्तीवर असलेल्या प्राजक्ता वर्मा यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारने १६ जून रोजी डॉ. जोशी आणि प्राजक्ता वर्मा यांची बदली केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी या दोन्ही बदलींना स्थगिती देण्यात आली होती. आठवडाभराने या दोन्ही अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.

दोन जिल्ह्यांचे पालक सचिवही बदलले

दरम्यान, अकोला जिल्ह्याच्या पालक सचिवपदी सौरभ विजय यांच्याऐवजी परिमल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परभणीच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंढे यांच्याऐवजी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक झाली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स