‘स्ट्रोक’ रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणार; रिमोट रोबोटिक न्युरोइंटरव्हेन्शन उपचार पद्धती उपलब्ध करून देणार  (Photo-X/@abitkar_prakash)
मुंबई

Mumbai : ‘स्ट्रोक’ रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणार; रिमोट रोबोटिक न्युरोइंटरव्हेन्शन उपचार पद्धती उपलब्ध करून देणार

ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने व अत्याधुनिक उपचार देण्यासाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ हा दूरस्थ पद्धतीने रोबोटिक उपचार सुविधा देणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने व अत्याधुनिक उपचार देण्यासाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ हा दूरस्थ पद्धतीने रोबोटिक उपचार सुविधा देणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत स्ट्रोक (पक्षाघात) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या रुग्णाना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे महत्त्वाचे असते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक सुविधा वेळेत न मिळाल्यास रुग्णाला कायमस्वरूपी पक्षाघाताचा धोका वाढतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुका, जिल्हास्तरीय सरकारी रुग्णालयांमध्ये स्थानिक पातळीवरच ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आरोग्यमंत्र्यांचा मानस आहे.

आरोग्यसेवा आयुक्तालयात आरोग्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली त्या अनुषंगाने प्राथमिक बैठक झाली. यावेेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमा खापरे, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, केईएमचे वरिष्ठ हायब्रिड न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे उपस्थित होते.

केईएम रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रोक रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा चाचणी २०२०सालामध्ये करण्यात आली. या रुग्णालयातील वरिष्ठ हायब्रिड न्युरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध करून देणेबाबत विचार सुरू आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना ‘हब आणि स्पोक’ प्रणालीद्वारे ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सुविधा देण्यात येणार आहे.

संकल्पनेनुसार मुंबईतील केईएम रुग्णालयात मुख्य रोबोटिक नियंत्रण केंद्र कार्यरत असेल, तर जिल्हा व तालुकास्तरीय रुग्णालयांमध्ये दुय्यम रोबोटिक प्रणाली कार्यरत असतील. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर आपल्या नियंत्रण प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये उपस्थित वैद्यकीय पथकाच्या मदतीने न्यूरोअँजिओग्राफी, स्ट्रोक इंटरव्हेन्शन प्रक्रिया पार पाडतील.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स