विद्यार्थ्याला प्रथमच मिळणार CET ची दोन प्रवेशपत्रे; अस्थायी प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे ठिकाण; परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

विद्यार्थ्याला प्रथमच मिळणार CET ची दोन प्रवेशपत्रे; अस्थायी प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे ठिकाण; परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर १७व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी २४ मार्च ते १६ मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. यावर्षी प्रथमच सीईटी कक्ष विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेची एक अस्थायी व एक अंतिम अशी दोन प्रवेश पत्रे देणार आहे.

Swapnil S

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर १७व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी २४ मार्च ते १६ मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. यावर्षी प्रथमच सीईटी कक्ष विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेची एक अस्थायी व एक अंतिम अशी दोन प्रवेश पत्रे देणार आहे. परीक्षा केंद्राचे शहर अस्थायी प्रवेशपत्रात देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

सीईटी कक्षाने प्रवेश परीक्षांचे अंतिम परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. यानंतर त्या त्या प्रवेश परीक्षेच्या ८ ते १० दिवस आधी अस्थायी प्रवेशपत्र विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन उपलब्ध होतील. या अस्थायी प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेसाठी कोणता जिल्हा व कोणते शहर आले आहे हे समजू शकेल. विद्यार्थी परीक्षा केंद्र भरताना पसंतीक्रमानुसार त्याला चार जिल्हे भरावे लागतात. यानुसार या अस्थायी प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात व कोणत्या जिल्ह्यात आहे, यासंबंधीची माहिती उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेच्या तीन ते चार दिवस आधी अंतिम प्रवेशपत्र त्याच्या लॉग-इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या अंतिम प्रवेशपत्रात प्रत्यक्ष परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्राचा कोड, परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता याची माहिती दिली जाईल.

सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि तालुक्यासह त्यांच्या परीक्षा केंद्राच्या तपशीलांची पडताळणी करणे आवश्यक आहे आणि त्यांचे अंतिम प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे. सीईटीच्या परीक्षेसंबंधी अद्ययावत माहिती आणि पुढील सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...