मुंबई

T20 Final साठी रेल्वेची खास सोय; मुंबई-पुण्याहून अहमदाबादसाठी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)-अहमदाबाद आणि पुणे-अहमदाबाद दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे...

किशोरी घायवट-उबाळे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (दि. ८ मार्च) होणाऱ्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यातील चाहत्यांना अहमदाबादला जाण्या-येण्यासाठी सुविधा मिळावी यासाठी मध्य रेल्वेकडून ४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)-अहमदाबाद आणि पुणे-अहमदाबाद दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे अंतिम सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे.

सीएसएमटी-अहमदाबाद एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

ट्रेन क्रमांक ०११५३ ही एसी सुपरफास्ट विशेष गाडी ७ मार्च रोजी रात्री १०.०५ वाजता सीएसएमटी येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता अहमदाबादला पोहोचेल.

परत येण्यासाठी ट्रेन क्रमांक ०११५४ ही गाडी ९ मार्च रोजी पहाटे ४ वाजता अहमदाबादहून सुटून त्याच दिवशी दुपारी १२.५५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

या गाडीला दादर, ठाणे, वसई रोड, सुरत आणि वडोदरा येथे थांबे असतील. या गाडीत १८ थर्ड एसी इकोनॉमी डबे आणि २ जनरेटर कार असतील.

पुणे-अहमदाबाद सुपरफास्ट विशेष

तसेच ट्रेन क्रमांक ०१४१७ ही सुपरफास्ट विशेष गाडी ७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता अहमदाबादला पोहोचेल.

परत येण्यासाठी ट्रेन क्रमांक ०१४१८ ही गाडी ९ मार्च रोजी पहाटे २ वाजता अहमदाबादहून सुटून त्याच दिवशी दुपारी १२.१० वाजता पुणे येथे पोहोचेल.

या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत आणि वडोदरा येथे थांबे असतील. गाडीची रचना १ AC II, ५ AC III, १० स्लीपर कोच, ४ सामान्य II तसेच २ II सीटिंग व गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.

रेल्वे रिझर्वेशनची माहिती

या विशेष गाड्यांसाठी ७ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षित केंद्रांवर तसेच IRCTC च्या www.irctc.co.in संकेतस्थळावर तिकिट बुकिंग सुरू होणार आहे.

तसेच अनारक्षित डब्यांसाठी UTS प्रणालीद्वारे तिकिटे उपलब्ध असतील. प्रवासी RailOne ॲप डाउनलोड करूनही तिकिट बुक करू शकतात.

या गाड्यांच्या थांब्यांचा सविस्तर वेळ जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग