मुंबई

गणेशोत्सवात डीजे, लाऊडस्पीकरचा आवाज घुमणार; हायकोर्टाचा लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास नकार

गणेशोत्सवाबरोबरच धार्मिक मिरवणुका, सण-उत्सव व इतर समारंभांमध्ये लेझर बीम आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनी प्रणालीचा वापर करण्यावर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवाबरोबरच धार्मिक मिरवणुका, सण-उत्सव व इतर समारंभांमध्ये लेझर बीम आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनी प्रणालीचा वापर करण्यावर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने २०२० च्या ध्वनीप्रदूषण नियमावलीतील आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या लाऊडस्पीकर व इतर साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांना योग्य प्राधिकरणाकडे दाद मागावी, असे निर्देश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवात डीजे, लाऊडस्पीकरचा आवाज घुमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सण-उत्सवांमध्ये वापरण्यात येणारे लेझर बीम धोकादायक आहेत. त्यामुळे अनेकांची दृष्टी गेली असून डीजे सिस्टिम व तत्सम अन्य प्रणालींपासून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना ऐकू न येण्याची समस्या निर्माण झाली आहे. ध्वनिप्रदूषणामुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होतात, असा दावा करून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय जाहीर करताना लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास हायकोर्टाचा नकार देत याचिका निकाली काढली.

संविधान हातात घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; डॉ. जी. परमेश्वर नवे उपमुख्यमंत्री, १३ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश

ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Mumbai : प्रतीक्षा संपली! मृणालताई गोरे उड्डाणपूल ६ जूनपासून सुरू; पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ट्रॅफिक कमी होण्याची शक्यता

Mumbai Rain : पावसाच्या हलक्या सरींमध्येच अंधेरी सबवे पाण्याखाली; BMC च्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

शरीरावर ९१ जखमा, ७ बरगड्या मोडल्या; दीड वर्षांच्या चिमुकल्यावर आईच्या लिव्ह-इन पार्टनरकडून अमानुष अत्याचार