बड्या व्यक्तीच्या हत्येचा होता कट; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा  संग्रहित छायाचित्र
मुंबई

बड्या व्यक्तीच्या हत्येचा होता कट; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून अभिनेता हा हल्लेखोरांचे मूळ लक्ष्य नसल्याचे उघड झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

प्रतिनिधी

पूनम अपराज/मुंबई

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून अभिनेता हा हल्लेखोरांचे मूळ लक्ष्य नसल्याचे उघड झाल्याचा दावा करण्यात येत आहे. प्राथमिक तपासानुसार, दुसऱ्या एका बड्या व्यक्तीची हत्या करण्याच्या उद्देशाने हल्लेखोर मुंबईत आले होते. मात्र, नियोजित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात अपयश आल्यानंतर आणि कथित सूत्रधारांकडून सूचना मिळाल्यानंतर त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचे समजते.

हल्ल्याचे मूळ लक्ष्य असलेल्या सेलिब्रिटीची ओळख पटविण्यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आरोपींनी सोशल मीडियावरील टायगर श्रॉफच्या रील्सवरून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. प्राथमिक चौकशीत त्यांनी या व्हिडिओंच्या मदतीने या अभिनेत्याला पोलिसांची सुरक्षा नसल्याचेही पडताळून पाहिल्याचे सांगितले जात आहे.

ओळख लपविण्यासाठी केले मुंडन

हृतिक हा अंधेरी पूर्व परिसरात राहत होता आणि रॅपिडो टॅक्सी तसेच दुचाकीस्वार म्हणून काम करत असल्याचे समजते. तो अनेक महिन्यांपासून अंधेरीतील गिल्बर्ट हिल परिसरात राहत होता. मात्र, सुमारे महिनाभरापूर्वी त्याने हे भाड्याचे घर सोडले होते. बिहारमधील बेगुसराय येथील आरोपी हृतिक कुमार ऊर्फ रोशन याने आपली ओळख लपविण्यासाठी मुंडन केले होते. भाड्याची घरेही बदलली होती, असा आरोप आहे. गोळीबाराच्या वेळी तो दुचाकी चालवत असल्याचे सांगितले जाते. रेहान ऊर्फ सुक्का याच्याविरुद्ध यापूर्वी चोरी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. हल्ल्याच्या वेळी त्याने सर्वाधिक गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

ओळख लपविण्याच्या उद्देशाने आरोपींनी रेल्वेने प्रवास करताना केस लहान केले आणि कपडेही बदलले, असे सांगितले जाते. पोलिसांना अद्याप त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले नसल्याची माहिती आहे.

बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू...

अभिनेत्याची हत्या करून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करणे, हा या हल्ल्यामागील कथित हेतू असल्याची माहिती तपासातून प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे. आरोपींनी शस्त्रे कुठून मिळवली आणि हल्ला घडवून आणण्यासाठी त्यांना किती पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Uddhav Thackeray Dussehra Rally : सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हा, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Eknath Shinde Dussehra Rally: भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

राष्ट्रीय हितासाठी एकत्र यावे; पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

आंदोलनांमुळे फुटीचा धोका - सरसंघचालक; विजयादशमी महोत्सवात केले शस्त्रपूजन