Mumbai : तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव 
मुंबई

Mumbai : तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यापूर्वीच सुमारे ६०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या पोलिसांच्या कारवाईवरून शनिवारी मुंबईत राजकीय वातावरण तापले.

Swapnil S

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यापूर्वीच सुमारे ६०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या पोलिसांच्या कारवाईवरून शनिवारी मुंबईत राजकीय वातावरण तापले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या घटनेनंतर त्यांना तातडीने सोडण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, मुंबईत वरुण देसाईंसह सुमारे ६०० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर मुक्तही करण्यात आले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच मुंबईतील विविध भागातून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तुषार गांधी यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवरून आणि त्यांच्या ठावठिकाण्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे या आंदोलनाला राजकीय वळण मिळाले.

आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास तुषार गांधी यांना वांद्रे परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, नंतर ते या पोलीस ठाण्यात नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने त्यांच्या ठावठिकाण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता.

या प्रकरणाची माहिती मिळताच आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्यासह ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी, आमदार हारून खान आणि आमदार अनंत (बाळा) नर, आमदार महेश सावंत यांच्यासह काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष मोहसिन हैदर, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष भावना जैन तसेच महाविकास आघाडीचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते डी.एन. नगर पोलीस ठाण्यात पोहोचले. काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. तुषार गांधी यांची तातडीने सुटका करण्याची मागणी करत आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. त्यामुळे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून 'वोट चोर, गद्दी छोड' अशा घोषणा दिल्या.

... तर आम्ही शांत बसणार नाही!

ज्या देशात गांधींना आणि देशप्रेमींना अटक होऊ शकते असे देशद्रोही सरकार देशात राजवट करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यापुढे कोणालाही अटक झाली तर आम्ही शांत बसणार नाही. येथील वातावरण चिघळले तर याला भाजपची राजवट जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका! दीपके, रांका, दास यांची विमानातच धरपकड; चार माजी मुख्यमंत्र्यांना केले स्थानबद्ध, दिल्लीत सात हजार आंदोलक ताब्यात

ज्ञानेशसह हे सरकारही जाईल - राहुल गांधी

Navratri 2026 Wishes : 'उदे गं अंबे उदे!' नवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश अन् HD कार्ड्स

Navratri 2026 : नवरात्रीचे नऊ दिवस अन् देवीची नऊ रूपं! प्रत्येक रूपामागे दडलाय खास अर्थ, तुम्हाला माहीत आहे का?

Navratri 2026 : उकडलेल्या रताळ्यांना द्या कुरकुरीत ट्विस्ट; उपवासासाठी 'असा' बनवा झटपट चाट