मुंबई

बेस्ट बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोघांचा मृत्यू

नवशक्ती Web Desk

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बेस्ट बसच्या अपघातात वाढ झाली असून, शनिवारी मध्यरात्री १. ४५ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव चेक नाका येथील बेस्ट बसने रिक्षाला धडक दिली. या दुर्घटनेत जॉनी शंकरराम (४२) व सुजाता पंचाकी (३८) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.बस क्रमांक १४५३ एमएचओ १ एपी ०२२२६ पोईसर डेपो, बस क्रमांक १८६२ एमएचओ ०१ एपी ०७४६ या दोन्ही बसेस पोईसर बस डेपोत जात असताना गोरेगाव चेक नाका ईस्टन एक्स्प्रेस हायवे येथे बस क्रमांक १४५३ ही पुढे होती. बस चालकाने ब्रेक मारल्याने बस क्रमांक १८६२ ने बस क्रमांक १४५३ ला धडक दिली. पाऊस पडत असल्याने बस क्रमांक १८६२ घसरली आणि रिक्षाला धडकली आहे . या दुर्घटनेत रिक्षात बसलेले जॉनी शंकरराम व सुजाता पंचाकी जखमी झाले आहेत. दोघांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

Navi Mumbai : एमपीएससी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

Kolhapur : माधुरी हत्तीणीचे जंगी स्वागत, Video