Mumbai : माटुंगा आणि कॉटन ग्रीन परिसरात झालेल्या दोन अपघातांत दोघेजण ठार प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : माटुंगा आणि कॉटन ग्रीन परिसरात झालेल्या दोन अपघातांत दोघेजण ठार

माटुंगा आणि कॉटन ग्रीन परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

मुंबई : माटुंगा आणि कॉटन ग्रीन परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रोजच्या नियमाप्रमाणे पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) बाहेर पडलेल्या एका ७४ वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे.

माटुंग्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रुईया कॉलेज जंक्शनजवळ २३ मे रोजी पहाटेच्या सुमारास प्रवीणचंद्र शहा (वय ७४) यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. ते प्रेम गिरीजा इमारतीत राहायचे. दररोज पहाटे ३.३० वाजता ते सायकलवरून मॉर्निंग वॉकला जात असत आणि ५ वाजेपर्यंत परतत असत. मात्र, घटनेच्या दिवशी ते न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

त्यांचा मुलगा बंकिम शहा (४७) यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना एका अपघातातील मृतदेहाचा फोटो दाखवला, जो रुईया जंक्शनवर पहाटे ३.३५ वाजता घडलेल्या अपघातातील होता. बंकिम यांनी तो मृतदेह त्यांचे वडील प्रविनचंद्र यांचा असल्याचे ओळखले. पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद शफीक शेर मोहम्मद खान (४९) याला ताब्यात घेतले असून, बंकिम शहा यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत कॉटन ग्रीन परिसरात २२ मे रोजी एका अनोळखी व्यक्तीचा अग्निशमन दलाच्या वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना शिवडी पंपिंग स्टेशन पार्किंग परिसरात घडली. पोलीस हवालदार पूजा शरद बोर्डे (२८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संध्याकाळी ६.५५ च्या सुमारास अग्निशमन दलाची गाडी मागे घेत असताना ती एका अनोळखी व्यक्तीच्या अंगावरून गेली.

या अपघातात त्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. काळाचौकी पोलिसांनी गाडीचा चालक अंकित शशिकांत म्हात्रे (२५) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया